
कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांतून एकदा केला जात आहे. लातूर महापालिकेवर सुमारे तीनशे कोटींचे देणे आहे.
लातूर : लातूर महापालिका स्थापनेपासूनच आर्थिक अडचणीत आहेत. तारेवरची कसरत करीत महापालिकेचा गाडा हाकला जात आहे; पण त्यात कोरोनामुळे तर महापालिकेचे कंबरडेच मोडले आहे. अपेक्षित उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांतून एकदा केला जात आहे. महापालिकेवर सुमारे तीनशे कोटींचे देणे आहे. आर्थिक अडचणी असल्याने विकासकामे सध्या कागदावरच आहेत.
‘एमपीएससी’च्या स्पर्धकांची संख्या पाच लाखांहून पंचवीस लाख,पासष्ट हजार पदांसाठी...
लातूर महापालिका स्थापनेपासूनच अनेक समस्यांना सामोरे जात आहे. पहिल्यापासूनच महापालिका आर्थिक अडचणीत आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, महापालिकेच्या मालमत्तांतून मिळणाऱ्या करातून कसाबसा कारभार महापालिका करीत आहे. मार्च महिना महापालिकेसाठी वसुलीचा महिना असतो. मार्चच्या सुरवातीला महापालिकेने विविध करांची वसुलीही सुरू केली होती.
दुकानांना सीलही ठोकण्याची कारवाई केली जात होती; पण या महिन्यापासूनच कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने वसुली मोहीम थंडावली. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. बांधकाम परवान्यातून मिळणारे उत्पन्नही बंद आहे. मालमत्ता कराची वसुली बंद झाली आहे.
‘आरोग्या’तही सहा महिने थांब! भरतीची प्रक्रिया सात महिन्यांपासून थंडच
पाणीपट्टी कोणी भरत नाही. महापालिकेचे अठराशेच्या वर गाळे आहेत; पण त्यांच्या भाड्याचा प्रश्न गेल्या एक-दीड वर्षापासून वादात आहे. त्यामुळे हे भाडेही गाळेधारकांकडून भरले जात नाही. उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने दोन महिन्यातून एकदा पगार केला जात आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करीत आहेत. महापालिकेवर सध्या तीनशे कोटींच्या घरात देणे आहे. याचे हप्ते फेडता फेडता महापालिकेच्या नाकीनऊ येताना दिसत आहेत.
महापालिकेचे एकूण अपेक्षित उत्पन्न--१६० कोटी
महापालिकेचे एकूण देणे--३०० कोटी
घटक --------- अपेक्षित उत्पन्न---- प्रत्यक्ष जमा
मालमत्ता कर------- ४३ कोटी-------- -६ कोटी
महापालिकेचा मालमत्ता कर--६ कोटी----------२० लाख
पाणीपट्टी---११ कोटी-----------------७० लाख
मुद्रांक शुल्क--६५ लाख-----------अद्याप मिळालेले ना
जीएसटी-- १६ कोटी---- ६.७५ कोटी
संपादन - गणेश पिटेकर