Lature News : लातूरमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

अवैध धंद्यांवरही कारवाई; साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
lature
lature sakal

लातूर - गणेशउत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन, अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली. यात साडे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई, ठिक-ठिकाणी नाकाबंदी व रुटमार्चही करण्यात आला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सण-उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावे याकरिता ता. १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष कारवाई मोहीम, तसेच कोंबिंग ऑपरेशन, रुटमार्च, शांतता समितीच्या बैठका, मोठ्या प्रमाणात गाव भेटी, संपर्क अभियान, गुन्हेगार व शांतता भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात जुगाराच्या संदर्भाने ८२ व्यक्ती विरोधात ३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण एका लाख १६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

lature
Lature News : हद्दपारीच्या प्रस्तावांना लातुरात महसुली खोडा

देशी विदेशी दारु, हातभट्टी याची वाहतूक व निर्मिती करणाऱ्या १२२ जणाविरुद्ध १०० गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन लाख रुपयाची हातभट्टी दारुचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. तसेच एक लाख ३४ हजार ८३० रुपयाची देशी-विदेशी कंपनीची दारू जप्त करण्यात आली आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. विविध गुन्ह्यात फरार असलेल्या पाच गुन्हेगारांना ताब्यात आले.

lature
Latur Pattern: लातूरच्या सुपुत्राचा पगार आहे चक्क 78 कोटी, वय आहे फक्त 37 वर्षे

न्यायालयाकडून काढण्यात आलेले आरोपी विरुद्धचे ९८ अटक वॉरंट बजावण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात ११० लॉजेस तसेच हॉटेलची तपासणी करण्यात आली.तसेच फरार आरोपींचाही शोध घेण्यात आला. न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या १९ आरोपींना वॉरंट बजावणी करुन अटक करण्यात आली. जिल्ह्यात विविध २३ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून ८२७ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.तसेच ३० मर्मस्थळाची तपासणी करण्यात आली. पोलिस रेकॉर्ड वरील ५३ सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले आहे.

मालमत्तेविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या नऊ जणाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२(क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्यावर २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी जोरदार कारवाया केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत आहे.

lature
Pune News : भाटघर धरण १०० टक्के भरले

गुन्हेगार लोकांवर अशी झाली कारवाई

फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १०७ अन्वये ८६८ व्यक्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ११० अन्वये १३६ गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई

फौजदार प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे एक हजार ७४४ व्यक्तींना नोटीस

वारंवार दारुबंदी अधिनियम कायद्याचा भंग करणारे, अनेक गुन्हे दाखल असलेल्या २६६ सराईत अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ अन्वये ३ गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com