esakal | दुर्दैवी! उदगीर तालुक्यात वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल ठार

बोलून बातमी शोधा

udgir lightning

गेल्या दोन दिवसांपासून उदगीर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते

दुर्दैवी! उदगीर तालुक्यात वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल ठार
sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर): उदगीर तालुक्यात सोमवारी  (ता.१२) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून चार जनावरे दगावली आहेत. नळगीर येथे तीन म्हशींचे तर माळेवाडी येथील एका बैलाचा विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

याबाबत महसूल सूत्राकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी चारच्या सुमारास अचानक पणे उदगीर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. त्यातच बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, बडी ज्वारी, द्राक्षे, आंबा फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Break the Chain: कन्नड शहरात व्यवहार बंद, ग्रामीण भागात मात्र दुकाने सुरु 

विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नळगीर यथे अवकाळी पाऊसात विज पडून अशोक मनोहर बंडे यांच्या दोन म्हशी, पढरी देवराव भालेराव यांची वय ७ वर्षीय म्हैस विज पडून मयत झाली आहे. माळेवाडी येथे देवेंद्र नागशेट्टी येरोळे याचे शेतात वीज पडून एक बैल दगावला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उदगीर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. सोमवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अजूनही वातावरण किती दिवस राहणार व बेमोसमी पाऊस किती पडणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अगोदरच कोरोना संसर्गाचे संकट असतानाच बेमोसमी पावसाचाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनासमोर नवीन आव्हाने निर्माण झाले आहे.