World Meteorological Day 2021: बदलत्या हवामानाचा पिकांवर होतोय परिणाम

world meteorological day 2021
world meteorological day 2021

देवणी (लातूर): गेल्या दोन दशकाचा विचार केला जिल्ह्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, कीडनाशक व तणनाशकांचा पाण्यासारखा होत असलेला वापर याचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आताच चिंतन करण्याची वेळ आली आहे.  पूर्वीच्या काळात जिल्ह्यात पाऊस हा वर्षभर विभागून पडत होता. मात्र, गेल्या एक दशकातील आकडेवारी पाहता पावसाची विभागणी कमी झाली आहे.

एखाद्या महसूल मंडळात दीड ते दोन तासातच १२० ते १५० मिमी पाऊस पडतो तर अन्य ठिकाणी पाऊसच नाही ही निरीक्षणे आगामी काळातील धोक्याची घंटा दाखवणारी आहेत. वाढती वृक्षतोड, कमी होत जाणारी वने, वाहनाची झपाट्याने वाढती संख्या, मोबाईल मनोरे व मोबाईल वापराचा होत असलेला अतिरेक, जमिनीची होत असलेला धूप, याचा सरळ व दूरगामी परिणाम हवामानावर होत आहे. एक दशकाचे निरीक्षण पाहता पिकावर बऱ्याच नवीन कीडरोगांचा उद्रेक झालेला पाहावयास मिळत आहे. यावर्षी पहिल्यांदाच सोयाबीनवर काळा व हिरवा मावा पडला यासह अनेक पिकावर बदलत्या हवामानाची परिणाम दिसत आहे. निसर्गाचा होत असलेला रास यासाठी कारणीभूत मानणे गरजेचे आहे. 

एकात्मिक शेती व्यवस्थापन गरजेचे- 
हवामान बदलाच्या स्थितीत शेतकरी व शेतीव्यवस्थापन टिकवायचे असेल तर एकात्मिक शेती व्यवस्थापन करण्यावर भर देण्याची गरज आहे. शेतीचे अगोदरच लहान लहान तुकड्यात विभाजन झाले आहे. या उपलब्ध शेतीवर शेतकऱ्यांनी केवळ एकच पीक न घेता त्यात पोट्री व्यवसाय, शेळीपालन, दुग्धोत्पादन, तुती लागवड, फळबाग लागवड यासह बहुपिकपद्धतीचा समावेश करणे एकात्मिक शेतीमध्ये अपेक्षित आहे. तुती लागवड केल्यास त्यातून रेशीम उत्पादन मिळू शकेल व शिल्लक तुतीच्या पाला गुरांना दिल्यास दुग्धोत्पादनात वाढ दिसून येईल. गुरांच्या शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून केल्यास शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल व त्यातूनच बदलत्या स्थितीत शेती तग धरुन राहू शकेल. 

हवामान बदलाची तीव्रता कमी करावयाची असेल तर वृक्षलागवड, वनलागवड, फळबागांत पिकाखालील क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे. शिवाय पीकपद्धतीत बदल करून बदलत्या वातावरणात तग धरणारी पिके पुढे आली पाहिजेत. शिवाय लागवड पद्धती व लागवड हंगाम देखील आवश्यकतेनुसार बदलणे गरजेचे व आवश्यक आहे. 
- डॉ. विजय भामरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, लातूर  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com