'त्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी शेवटची इच्छा आहे'; फेसबुकवर व्हिडिओ करत तरुणानं संपवलं जीवन, आंब्याच्या झाडाखाली आला अन्...
Latur Crime News : भरतिमग गेली अनेक वर्षे मुंबईत वास्तव्यास होता. शनिवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळील आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुकवर हा थेट व्हिडिओ करत होता.
लातूर : निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भरत बालाजी सागावे (वय 32) या तरुणाने फेसबुकवर थेट व्हिडिओ (Facebook Video) शेअर करत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून (Nilanga Shocking Incident) आत्महत्या केलीये.