esakal | आता टपाल, पासपोर्ट कार्यालय झाले बंद

बोलून बातमी शोधा

Latur Passport Office, Latur News

गर्दी टाळण्यासाठी लातूर आणि उस्मानाबादमधील पोसपोर्ट (पारपत्र) कार्यालय सोमवारपासून (ता.२३) ते ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. शिवाय, उस्मानाबाद शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच लातूर शहरातील मुख्य टपाल कार्यालय, टिळक नगर आणि उदगीरमधील टपाल कार्यालय वगळता दोन्ही जिल्ह्यांतील अन्य सर्व टपाल कार्यालये आजपासून बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती टपाल कार्यालय अधीक्षक बी.रविकुमार यांनी सोमवारी (ता.२३) ‘सकाळ’ला दिली.

आता टपाल, पासपोर्ट कार्यालय झाले बंद

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : गर्दी टाळण्यासाठी लातूर आणि उस्मानाबादमधील पोसपोर्ट (पारपत्र) कार्यालय सोमवारपासून (ता.२३) ते ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. शिवाय, उस्मानाबाद शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच लातूर शहरातील मुख्य टपाल कार्यालय, टिळक नगर आणि उदगीरमधील टपाल कार्यालय वगळता दोन्ही जिल्ह्यांतील अन्य सर्व टपाल कार्यालये आजपासून बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती टपाल कार्यालय अधीक्षक बी.रविकुमार यांनी सोमवारी (ता.२३) ‘सकाळ’ला दिली.


‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळेच सरकारने शाळा-महाविद्यालये, खासगी शिकवण्यांना (क्लास) सुट्या देण्यात आल्या. मॉल, मल्टिप्लेक्स, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी बंद पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव रोखता यावा म्हणून आता टपाल आणि पासपोर्ट कार्यालय बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वाचा ः लातूर जिल्ह्यात ढाब्यावर छापा, दहा लाखांचा देशी-विदेशी दारु जप्त

घरातून काम करण्याच्या सूचना
लातूरात मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीतच पासपोर्ट कार्यालय आहे. येथे दररोज ५० जणांना पासपोर्टसाठी बोलवले जाते. त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी पासपोर्ट कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. पण कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घराबाहेर न पडता शिल्लक कामे पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचेही सांगण्यात आले आहे. अशीच पद्धत उस्मानाबादमधील पासपोर्ट कार्यालयाला लागू असणार आहे. कार्यालय बंद राहणार असल्याची सूचना प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.

हेही वाचा  ः तपासणीशिवाय महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी


टपाल कार्यालयात २० टक्के कर्मचारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरी टपाल कार्यालये दिवसाआड सुरू करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता आहेत. शिवाय, गावागावातील टपाल कार्यालयेही सुरू ठेवण्यात येणार होती. पण या निर्णयात २४ तासाच्या आतच टपाल कार्यालयाने बदल केला आहे. आता तालूका आणि गाव पातळीवरील सर्व टपाल कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ उस्मानाबाद शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच लातूर शहरातील मुख्य टपाल कार्यालय, टिळक नगर आणि उदगीरमधील टपाल कार्यालय  सुरू राहणार आहेत. या कार्यालयातही केवळ २० टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करून तयार केले जाणारे आधार आणि आयपीपीबीचे व्यवहार तात्पुरते थांबविण्यात आले आहेत, असेही बी. रविकुमार यांनी सांगितले.