esakal | नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्टवादीची रणनीती तर भाजपचा 'एकला चलो'चा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

Jalkot news

कोरोनाच्या महामारीमुळे जळकोट नंगरपंचायतीचा कार्यकाळ समाप्त होऊनही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत

नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्टवादीची रणनीती तर भाजपचा 'एकला चलो'चा नारा

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): सध्या नगरपंचायतीची मुद्दत संपली आहे. आगामी काही दिवसांत कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्या अंनुषगाने काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसनेही बैठकाचे सत्र सुरू ठेवले आहे. अद्याप काँग्रेस व राष्टवादी काँग्रेसची युती झाली नसली तरी तशी पावले दोनही पक्षाकडून उचलले जात आहेत. माञ भाजप वन मॅन शोच्या भूमिकेत असल्याने त्यांनी अजूनही आपले पत्ते खोलत नसल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे जळकोट नंगरपंचायतीचा कार्यकाळ समाप्त होऊनही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. सध्या कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणता आटोक्यात येत असल्याने नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होऊ लागली आहे. शहरातील सतरा प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. 15 फेब्रवारीला मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने केव्हांही निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात.

औशात काँगेससह राष्ट्रवादी जोमात तर भाजपाचे 'वेट अँड वॉच'

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दोन बैठका घेऊन इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवणे सुरु केले आहे. राष्टवादीचीही एक बैठक पूर्वी झाली असून दुसरी बैठक 5 फेब्रुवारीला होणार आहे. भाजपही दोन बैठका घेऊन निवडणुकीच्या कामाला लागली आहे. एकंदरीत नगरपंचायत निवडणुकीत मुख्य पक्ष असलेले भाजप, राष्टवादी काँग्रेस, काँग्रेस कामाला लागले असले तरी काँग्रेस व राष्टवादी काँग्रेसचे निवडणुकीसाठी युतीचे घोडे  भिजत असल्याचे दिसून येत आहे.

झेंड्याच्या चबुतऱ्याला धडकल्याने दुचाकी फेकली गेली दूर; सुनीलचा जागीच मृत्यू,...

भाजप स्वतंत्र लढत असल्याने पक्षाच्या आदेशाप्रमाणे कामाला लागले आहे. मागील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्टवादी वेगवेगळे लढल्यामुळे भाजपला फायदा होऊन नगरपंचायतीवर भाजपची पाच वर्षे सत्ता आली होती. भाजपच्या काळात पाच वर्षांत तीन नगराध्यक्ष झाले आहेत.

(edited by- pramos sarawale)