'जळकोटला डोंगरी तालुका करण्यासाठी मंत्री बनसोडे यांनी आपले वजन खर्च करावे'

शिवशंकर काळे
Wednesday, 10 February 2021

जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना अध्यक्ष केंद्रे यांनी तालुका हा डोंगराळ भाग अधिक आहे तसेच येथील जमिनी खडकाळ आहेत.

जळकोट (जि.लातूर): तालुका विकासापासून वंचित आहे. हा अनुशेष भरून काढायचा असेल तर जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळने गरजेचे आहे. त्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून विशेषबाब म्हणून डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.

जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना अध्यक्ष केंद्रे यांनी तालुका हा डोंगराळ भाग अधिक आहे तसेच येथील जमिनी खडकाळ आहेत. त्यामुळे शेतीतून उत्पन्न निघत नाही. शेतकऱ्यांना मुलाला शिक्षण देण्यासाठी पैसे अपुरे पडतात, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षणापासून वंचित आहेत.जळकोट तालुका डोंगरी तालुका म्हणून घोषित झाल्यास तालुक्यात अनेक विकासाची कामे करता येतील.

परभणी : सेंद्रिय पद्धतीने पेरुच्या यशस्वी लागवडीतून भरघोस उत्पन्न; मेघा सावंतची...

जिल्हा परिषदेकडून कोणतेही सहकार्य लागल्यास क्षणाचाही विलंब न लागता मदत मिळेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तालुक्याला राज्यमंञी पद मिळाले आहे. विकासाची काम होत असली तरी डोंगराळ भागातील शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थ्यांना डोंगरी तालुक्याची गरज असल्याने महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेष बाब म्हणून जळकोट तालुक्याला डोंगरी तालुका म्हणून मंजुरी मिळविण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रयत्न करावे असे केंद्रे म्हणाले.

आठवड्यातील एक दिवस गाडी न वापरता कर्मचारी येणार महाविद्यालयात

जळकोट तालुका हा माझा लाडाचा तालुका आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी जीव लावून प्रयत्न करणार असून येत्या अधिवेशनात जळकोट तालुका डोंगरी तालुका करण्यासाठी आवाज उठवू असे राज्यमंञी संजय बनसोडे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांचा प्रश्नाला उत्तर दिले. कार्यक्रमास राज्यमंत्री संजय बनसोडे, व्यंकटराव मुंडे, पंकज मुंडे, सरपंच राहुल सूर्यवंशी, चंदन पाटील नागरगोजे, अरविंद पाटील, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, अर्जुन आगलावे, डॉ. राम प्रसाद लखोटीया  आदी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur political news jalkot dongari taluka demanding sanjay bansode