फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात होणार सरपंचपदाच्या निवडी

युवराज धोतरे
Friday, 29 January 2021

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर एक महिन्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पुर्ण करण्यात येणार आहेत.

उदगीर (लातूर): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर एक महिन्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पुर्ण करण्यात येणार आहेत. ४ ते 12 फेब्रुवारी दरम्यान तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या नव्या कारभाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निहाय जाहीर करण्यात आलेला सरपंच निवडीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे-
अध्यासी अधिकारी संतोष चोपडे- अरसनाळ (ता.चार), इस्मालपुर (ता.आठ), एकुर्का रोड (ता.दहा), अध्यासी अधिकारी शिवशंकर पाटील-कासराळ (ता.५), करडखेल (ता.९), करवंदी (ता.११), व्यंकटेश दंडे-गुरधाळ (ता.४), वाढवणा खु (ता.८), करखेली (ता.१०), संभाजी चव्हाण-किनी येल्लादेवी (ता.५), जानापुर (ता.९), कुमदाळ (हेर) (ता.११), सुरेश घोके- कुमठा (ता.चार), जकनाळ (ता.८), टाकळी (ता.१०), रवींद्र जाधव कौळखेड (ता.५), खेरडा (ता.९), गंगापूर (ता.११), विकास सूर्यवंशी-गुडसुर (ता.५), अवलकोंडा (ता.९), राहुल सूर्यवंशी- चिघळी (ता.चार),  लोणी (ता.८), कुमदाळ (उदगीर) (ता.१०), राम कुलकर्णी-चांदेगाव (ता.५), डांगेवाडी (ता.९), डाउळ हिप्परगा (ता.११), संजयकुमार पाटील- दावणगाव (ता.४), डोंगरशेळकी (ता.८), तादलापूर (ता.१०), चिंतामणी कोकरे धडकनाळ (ता.५), धोंडीहिपरगा (ता.९), लिबगाव (ता.११), उत्तम केंद्रे-नळगीर (ता.४)

धक्कादायक! स्वतःच्या वडिलाला जिवंत जाळलं; मुलाला जन्मठेपेची शिक्षा

कोदळी (ता.८), महादेव वाघमारे-निडेबन (ता.५),पिंपरी (ता.९), राघोबा घंटेवाड- सुमठाणा (ता.४), बामणी (ता.८), हकनकवाडी (ता.१०), निळकंठ पवार- बेलसकरगा (ता.५) बोरगाव (ता.९), भाकसखेडा (ता.११), विजय आजणे-मल्लापुर (ता.४), मांजरी (ता.८), मादलापुर (ता.१०), संजय शिंदाळकर-माळेवाडी (ता.५), येनकी (ता.९), वागदरी (ता.११), विवेकानंद स्वामी-लोहारा (ता.८), क्षेत्रफळ (ता.१२), सुधाकर आवंडकर- शिरोळ (ता.४), शेल्हाळ (ता.८), हिप्परगा (ता.१०), बालाजी धमनसुरे-हंगरगा (ता.४), हंडरगुळी (ता.८), अल्लाउद्दीन शेख-हाळी (ता.४), रुद्रवाडी (ता.८), संजय गुजलवार-हेर (ता.५), होनीहिपरगा (ता.९), यशपाल सातपुते-वाढवणा (बु) (ता.८), अडोळवाडी (ता.१२) 

आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या तारखा आता निवडणूक विभागाने जाहीर केल्या असून या कार्यक्रमानुसार त्या गावात ग्रामपंचायतींना नवे कारभारी मिळणार आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदाराला शिवसेनेचा जोरदार धक्का; चार नगरसेवक शिवबंधनात

अनेक गावात चुरशीच्या लढती-
शुक्रवारी (ता.२९) सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच अनेक गावातील नूतन ग्रामपंचायत सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. यात वाढवणा, निडेबन, हेरसह अनेक गावात चुरशीच्या लढती होणार आहेत. ग्रामपंचायतीचा कारभारी नेमका कोण? कोणत्या गटाचा? याची उत्सुकता आता ग्रामस्थांना लागली आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur political news Sarpanch elections will be held in the first fortnight of February