Latur Rain Updates : लातूर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस

मदनसुरी (जि.लातूर) : गुरुवारी सायंकाळी झालेला पाऊस.
मदनसुरी (जि.लातूर) : गुरुवारी सायंकाळी झालेला पाऊस.
Updated on
Summary

यंदा रोहिणी नक्षत्रातच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जूनच्या सुरवातीलाच पेरण्या केली. पण, मृगात पावसाने बहुतांश भागात उघडीप दिली.

उजनी/ मदनसुरी/ बेलकुंड (जि.लातूर) : परिसरात Rain In Latur गुरुवारी (ता. एक) सायंकाळी मुसळधार पावसाने Rain हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावले असून, ज्यांनी नुकतीच पेरणी केली त्यांचे पीक उगवण्यास हा पाऊस उपयोगी ठरणार आहे. शिवाय ज्यांनी दोन ते तीन आठवड्यांपूर्वी पेरणी केली त्यांची पिके टवटवीत झाली. यंदा रोहिणी नक्षत्रातच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जूनच्या सुरवातीलाच पेरण्या केली. पण, मृगात पावसाने बहुतांश भागात उघडीप दिली. परिणामी, ज्यांनी पेरणी केली नाही त्यांची पेरणी Sowing Season रखडली होती. शिवाय ज्यांनी सुरवातीला पेरणी केली ज्यांचे पीक कोमेजून जात होते. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे उगवलेले पीक टवटवीत झाले. आता गुरुवारच्या पावसामुळे त्यांच्या वाढीस फायदा होणार आहे. गुरुवारी उजनी येथे सायंकाळी अर्धा तास दमदार पाऊस झाला. बेलकुंड आणि मदनसुरी येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली. latur rain updates heavy rain in ujani, madansuri, belkund

लोहाऱ्यात रिमझिम

उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील लोहारा Lohara शहर आणि परिसरात सायंकाळी रिमझिम पाऊस झाला. येडशी परिसरातही रिमझिम पाऊस झाला. या परिसरातील शेतकऱ्यांना Farmer अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मदनसुरी (जि.लातूर) : गुरुवारी सायंकाळी झालेला पाऊस.
Nath Palkhi : नाथांच्या पालखीचे प्रस्थान, पैठणला मोजके भाविक हजर

जळकोट तालुक्यात शेतकरी सुखावले

जळकोट (जि. लातूर) पावसाअभावी खरिपाची कोवळी पिके करपू लागली होती. अनेकांची पेरणी खोळंबली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आकाशात अचानक काळ ढग येऊन मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com