लातूर: स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
लातूर: स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा
sakal
Updated on

लातूर : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेवर जास्तीत-जास्त प्रतिनिधी पाठवण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बळ देण्याचे काम लातूर शिवसेना करेल असा विश्वास पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी येथे व्यक्त केला. शिवसेना पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून पक्षाला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लातूर: स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा
Osmanabad Rain Updates : उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी

येथे मंगळवारी (ता. २१) शिवसेनेचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खैरे यांच्या उपस्थितीत १५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या प्रयत्नातून हे प्रवेश झाले. खैरे म्हणाले, ‘‘भाजप निव्वळ बेगडी हिंदुत्व घेऊन जनतेसमोर जात आहे. पण, शिवसेना हिंदुत्व कधीही सोडणार नाही. पुढील आठ महिन्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्याने पक्षासाठी निष्ठेने काम करून पक्ष संघटन मजबूत करावे. लातूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद व नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याची तयारी ठेवावी’’, असेही खैरे म्हणाले.

जिल्हा प्रमुखपदी शिवाजी माने यांची नियुक्ती झाल्यापासून लातूरच्या शिवसेनेस नवसंजीवनी प्राप्त झाल्याचे समाधान यावेळी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. माने यांच्यावर या सर्व निवडणुकांची जबाबदारी असल्याने त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसंपर्क अभियान संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आले. यातून १३१ गावांमध्ये शिवसेना पोचविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हाप्रमुख माने यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, उपजिल्हाप्रमुख शंकर रांजणकर, विनोद आर्य, शहर प्रमुख रमेश माळी, किसन समुद्रे, माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, पप्पू कुलकर्णी, महिला संघटक सुनीता चाळक, युवा उपजिल्हा प्रमुख राहुल मातोळकर, युवासेना विस्तारक प्रा. सूरज दामरे, तालुका प्रमुख बाबूराव शेळके, सतीश शिंदे, अविनाश रेश्मे, भागवत वंगे, सतीश देशमुख, प्रा. सोमनाथ स्वामी डिगोळकर, ईश्वर पाटील, हरिभाऊ सगरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com