Latur: ‘ब्रँड ॲम्बेसेडर’च्या शहरात आगाराचा ब्रँड घसरला; निधीअभावी नवीन बसस्थानकासह ‘डेपो’ची विकासकामे रेंगाळली

Latur ST Depot Development Faces Delay: एसटी महामंडळाचे ब्रँड ॲम्बेसेडर रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या लातूर शहरातच बसस्थानक आणि एसटी डेपोच्या विकासकामांना निधीअभावी खीळ बसली आहे.
Latur

Latur

esakal

Updated on

लातूर: महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी परिवहन विभागाने लातूरचे सुपुत्र व प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून काही महिन्यांपूर्वी निवड केली आहे. पण, त्यांच्याच शहरात नवीन बसस्थानकाबरोबरच मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी डेपोचा विकास करण्यासाठी परिवहन विभाग रस दाखविताना दिसत नाही. याबाबतच्या मागण्या सरकारदरबारी प्रलंबित राहणार असतील, विकासकामांना निधी मिळणार नसेल, तर महामंडळाची प्रतिमा उंचावणार कशी? असा प्रश्न लातूरकरांमधून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com