Latur : कच्च्या अवस्थेतील सोयाबीनची गाळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soyabean news

Latur : कच्च्या अवस्थेतील सोयाबीनची गाळणी

अहमदपूर : तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. सतत पडत असलेल्या पावसाच्या धास्तीमुळे शेतकऱ्यांनी कच्च्या अवस्थेतील असलेले सोयाबीन गाळणे चालू केले असूण काढणी व गाळणीने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी ४६ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली आहे. यावर्षी पेरणी केल्यापासून सोयाबीन पीक दुबार पेरणी, गोगलगायीचा हल्ला, पिवळा मोजॅक,पावसाची तडण व सततचा पाऊस अशा विविध कारणांनी सोयाबीन पीक अडचणीत सापडले. सध्या तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग आला असून निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन काढणीत शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे.

हेही वाचा: Latur : हासोरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनचे ढीग लावले असले तरी सततच्या वा-यासह होत असलेल्या पावसाने त्या ढिगाला इजा पोहचत आहे.सोयाबीन पिक ओले असून उन्हाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पीक सुकत नाही. लावलेल्या ढिगाऱ्यात काही सोयाबीनला कोंब फुटत असून काही शेंगा बुरशीजन्य आजाराने ग्रस्त झाल्या आहेत.

हेही वाचा: Latur : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्या; संजय बनसोडे

शेतकरी सोयाबीन काहीतरी हाती लागेल या आशेने ओल्या शेंगा असल्यातरी सोयाबीन गाळून घेत आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी एकरी चार ते पाच हजार तर गाळणीसाठी दोनशे रुपये प्रती कट्टा दर द्यावा लागतो आहे. एकंदरीत सुरवातीपासूनच या वर्षी सोयाबीन पिकाने शेतक-यांना आर्थिक अडचणीत आणले आहे.

हेही वाचा: Latur : विद्युतीकरणात मध्य रेल्वे विभागाची आघाडी

सततच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन आगोदरच अडचणीत सापडले आहे. सोयाबीन ढिग लावून ठेऊन ते ओलसर वातावरणात खराब होईल याची भीती वाटत आहे. शेंगा ओल्या असल्यातरी सोयाबीन गाळून घ्यावे लागत आहे.

- पंढरी केंद्रे, लांजी

हेही वाचा: Latur; लातूर जिल्ह्याच्या प्रगतीला मिळाले बळ

सध्या पाऊस काळ असल्याने सोयाबीन सर्वच ठिकाणी ओलसर आहे. सोयाबीन ओलसर असल्याने त्याला गाळण्यास जास्तीचे इंधन लागत असल्यामुळे यावर्षी प्रत्येक कट्टा गाळणीसाठी दोनशे रुपये मोबदला घेत आहोत.

- गणेश कच्छवे, लांजी.