

Latur News
esakal
लातूर: शहरातील वाहतूक कोंडी सोडवावी म्हणून महापालिका आणि पोलिस प्रशासन काही दिवसांपूर्वी हातात हात घेऊन रस्त्यावर उतरले. शहरातील प्रमुख चौकांत फौजफाटा उतरवून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग हातात घेतले. या प्रयोगांचा शहरात मोठा गवगवा करण्यात आला.
पण, आठवडाभराच्या आतच महापालिका आणि पोलिस प्रशासनाला आपल्या प्रयोगांचा विसर पडला. वाहतुकीला वळण लावण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पोलिसही गायब झाले. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ पहायला मिळत आहे.