Latur News: शहरातील कोंडी दूर करण्यासाठी प्रमुख वाहतूक मार्गात बदल; शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी उपाययोजना

Latur City Implements Alternate Routes to Reduce Traffic: लातूर शहरात वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रमुख मार्गात बदल केले; भुयारी मार्ग आणि पर्यायी मार्ग वापरून नागरिकांना सुकर प्रवास.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर पोलिसांनी आता वाहतूक मार्गात काही ठिकाणी बदल केले आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना करून ही कोंडी दूर केली जात आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त यांच्या पाहणी अहवाल अनुषंगाने वाहतूक कोंडीच्या समस्येसंदर्भात गंजगोलाई ते बार्शी रोडकडे व अंबाजोगाई रोड ते पीव्हीआर चौकाकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जाणारी वाहतूक वळविण्याबाबत वाहतूक मार्गात बदल केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com