दु:ख अनावर झाल्याने मुलीने वडिलांच्या मृतदेहाजवळच सोडला जीव | Nanded Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Crime
दु:ख अनावर झाल्याने मुलीने वडिलांच्या मृतदेहाजवळच सोडला जीव

दु:ख अनावर झाल्याने मुलीने वडिलांच्या मृतदेहाजवळच सोडला जीव

नांदेड : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून मुलीचा छळ होत असल्याचे पाहवत नसल्याने मुलीच्या वडिलाने आत्महत्या केली आहे. ही घटना जिल्ह्यातील शहापुरात (ता.देगलूर) Deglur) घडली. दुःख अनावर झाल्याने मुलीनेही (Nanded) वडिलांच्या शेजारी जीव सोडला. माधुरी शंकर भोसले हिचा आठ महिन्यांपूर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजे याच्याशी विवाह झाला होता. संदीप पुण्यातील कंपनीत नोकरी करतो. विवाहानंतर संदीपसह सासरच्या मंडळींनी कार आणि फ्लॅट खरेदीसाठी पाच लाखांची मागणी करित माधुरीचा छळ सुरु केला होता. याबाबत तिने वडील शंकर भोसले यांना सांगितले. लग्नासाठी भोसले यांनी कर्ज काढले होते.

हेही वाचा: जास्त मायलेज देणारी 'Bajaj Platina 100' खरेदी करा ४० हजारात

ते कर्ज फिटले नव्हते. त्यात पाच लाख रुपये कुठून आणायचे या विवंचनेतूनच त्यांनी सोमवारी(ता.१५) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. वडिलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचे दुःख माधुरीला सहन झाले नाही. तिने वडिलांजवळच जीव सोडला. शंकर भोसले यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन देगलूर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top