

लातूर : ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लातूर जिल्ह्यातून आजवर आलेल्या सुमारे ६ लाख लाभार्थी महिलांच्या अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहेत. संबंधित महिला खरोखरीच योजनेच्या निकषात बसतात का, त्यांना सरकारचा दीड हजार रुपयांपेक्षा जास्त निधी इतर योजनेतून मिळतो का, त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे का, घरात कोणी सरकारी नोकरदार आहे का याची फेरपडताळणी करण्यात येणार आहे.