Latur : विलासरावांच्या नावाला साजेल असेच काम करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur

Latur : विलासरावांच्या नावाला साजेल असेच काम करू

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आपल्या पारदर्शक कारभारातून सक्षमपणे मागील ३८ वर्षांपासून यशस्वी वाटचाल करत आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावाला साजेल असे काम आजपर्यंत करत आलो आहोत व यापुढे देखील हे काम त्याच निष्ठेने करत राहू, अशी ग्वाही मांजरा कारखान्याचे अध्यक्ष माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२०२२ अधिमंडळाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री तथा कारखान्याचे संचालक आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे उपस्थित होते.

शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी मांजरा परिवार कटीबद्ध आहे. भविष्यात मांजरा कारखान्याची गाळप क्षमता वाढवून शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर कारखान्याकडे यावा यासाठी नियोजन केले जाणार आहे. तसेच येणारा काळ हा स्पर्धेचा असून नवीन बदलांचा स्वीकार करून इथेनॉल निर्मिती सर्वाधिक क्षमतेने करून त्या माध्यमातून अधिकचा दर देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मांजरा कारखाना सभासदांना दीपावली निमित्त प्रति सभासद ५० किलो साखर प्रति किलो २५ रुपये प्रमाणे सवलतीच्या दरात देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. परिवारातील साखर कारखान्यामध्ये सकारात्मक स्पर्धा आहे. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी भविष्यात देखील खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन अमित देशमुख यांनी प्रास्ताविक श्रीशैल उटगे यांनी केले. विषयांचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले.