Latur News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पैसे कमी पडत असतील तर...; सरपंचाने पैशांचे बंडल भिरकावले तहसीलदारावर, नेमकं काय घडलं?
Flood Relief: लातूरच्या माकणी येथील सरपंचाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कमी पडत असलेल्या मदतीवर संताप व्यक्त करत तहसीलदारावर पैसे भिरकावले. सरपंचावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निलंगा, (जि. लातूर) : ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे अपुरे पडत असतील तर हे घ्या, आम्ही देतो...’ म्हणत माकणी (ता. निलंगा) येथील सरपंचाने तहसीलदाराकडे पैशाचे बंडल भिरकावल्याची घटना घडली.