Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Ujani and Majalgaon Dam Water: दहा वर्षांपासून उजनी-माजलगाव धरणातून पाणी आणण्याची योजना लालफितीत; शाश्वत उपाययोजना न झाल्याने लातूरला पुन्हा कोरड्या दुष्काळाचा सामना
Latur Water Storage

Latur Water Storage

asakal

Updated on

लातूर: जिल्ह्यात २०१५ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी रेल्वेने पाणी आणावे लागले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरसाठी उजनी व माजलगाव धरणांतून पाणी आणता येते का? याची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, गेली दहा वर्षे ही व्यवहार्यता शासनाच्या लालफितीत अडकली आहे. लातूरसाठी पाण्याच्या शाश्वत उपाययोजनेकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्याने जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मंत्रिमंडळाकडून पाहणी जिल्ह्याला २०१५ मध्ये भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com