
लातूर येथील तरुणाने दुचाकीने तेरा दिवसांत आठ हजार किलोमीटर प्रवास केला आहे.
लातूर : अवतीभवती अनेक जण वेगवेगळे विक्रम नोंदवत असताता. त्यांची दखल समाज, सरकार घेत असतो. काही जण जनजागृतीही करित असतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या ध्येयाने लातूर शहरातील एका तरुणाने आगळावेगळा विक्रम केला आहे.
अवघ्या बाविसाव्या वर्षी त्याने मोटारसायकलवरून तेरा दिवस प्रवास करीत सात हजार ८२० किलोमीटर अंतर पार केले आहे. सुवर्ण चतुष्कोनाची परिक्रमा पूर्ण केली आहे. प्रतीक राजकुमार फुटाणे असे त्याचे नाव आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या प्रतीकने काही दिवसांपूर्वी एक आगळावेगळा मार्ग निवडला.
युपीएससी परीक्षेला कोरोनाचा फटका; औरंगाबादेत पाच हजार उमेदवारांची दांडी
मोटारसायकलवरून देशभर फिरण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यानुसार १९ सप्टेंबरला त्याने येथून प्रस्थान केले. लातूर, हैदराबाद, विजयवाडा, विखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता, झारखंड, बिहार, वाराणसी, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, विजयवाडा, हैदराबाद ते लातूर असा प्रवास त्याने पूर्ण केला.
तेरा दिवसांत त्याने सात हजार ८२० किलोमीटर अंतर पार केले. एक ऑक्टोबरला प्रतीक येथे परतला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. या परिक्रमेत त्याने जनजागृती केली. दारू पिऊन वाहने चालवू नका, मुलींना वाचवा असा सामाजिक संदेश दिला. प्रतीकच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
संपादन - गणेश पिटेकर