

Latur ZP Election Row Congress Candidate Missing BJP In Fray
Esakal
राम काळगे, निलंगा, (जि. लातुर) ता. 27 : काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार अंजना चौधरी यांचं अपहरण झाल्याची तक्रार पक्षाने शनिवारी दिली होती. आता त्याच महिला उमेदवाराने पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं समोर आलंय. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलं जात आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील व निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनिल चौधरी यांचे अपहरण करण्यात आले म्हणून काँग्रेसने पोलिस अधिक्षकाकडे तक्रार दिली होती. पण अखेर त्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला आहे. यामुळे आता त्या प्रवर्गातून भाजप व पर्यायी भाजप म्हणून दोन उमेदवार शिल्लक आहेत. तर पर्यायी भाजप असलेला उमेदवार सध्या गायब असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल की निवडणूक होईल हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.