लातूरचे जिल्हाधिकारी बनले तान्हाजी, शंकरा रे शंकरा गीतावर केले नृत्य

Divisional Revenue Sports And Cultural Competation Latur
Divisional Revenue Sports And Cultural Competation Latur

लातूर, ता.10 : प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेल्या "तान्हाजी' चित्रपटातील "शंकरा रे शंकरा' या गीतावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नृत्य अन्‌ चित्रपटातील संवाद सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. अशीच दाद परभणी, बीड आणि नांदेडमधील स्पर्धक कलावंतांनी या वेळी मिळवली. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.


नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात परभणी, बीड, लातूर व नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्याला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास एक तासाचा वेळ देण्यात आला होता. यात लातूरच्या संघाने "गड आला; पण सिंह गेला' या थीमवर नृत्य-नाट्य सादर केले. यात जी. श्रीकांत, तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव, विलास मलिशे, अनिता ढगे, वाहिद शेख, गणेश शिनगिरे, शरण पत्री, चंद्रकांत फड, संदेश राठोड, संजय जाधव, ज्ञानेश्वर काळे, जयेश जगताप यात सहभागी झाले होते. या नृत्यातून मावळ्यांचा जोश, आवेश, शिवरायांबद्दलचा आदरही कलावंतांनी अभिनयातून सादर केला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला.


सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात रेणुका पुरी व सुप्रिया बिराजदार यांनी गणेश वंदनेने केली. नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांचे ढोलकी वादन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. तर अभिजित अवधुते यांनी "ही नवरी असली, ही मनात ठसली' हे गाणे सादर केले. अंबिका जोगदंड यांच्या लयबद्ध भरतनाट्यम नृत्याने प्रेक्षकांना मोहित केले. लातूरकर गायकांच्या दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए या समूह गायनाने देशभक्तीची ज्योत पेटवली. नायब तहसीलदार एम. देवणीकर यांच्या "जगावे की मरावे' या एकपात्री अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

माधव पांचाळ, श्रीहरी माने, रत्नाकर महामुनी व इतर कलाकारांनी नाटकातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. रेणुका पुरी, सानिया सौदागर, स्वाती गणगे, ज्योती गाढवे, अनिता निगोळे, अनुराधा विभुते, प्रणिता वरवटकर, शबाना पठाण व संगीता पाटील या कलाकारांनी राजस्थानी लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. नायब तहसीलदार वृषाली केसकर व आर. एम. देवणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com