
Maratha Reservation: मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंबंधी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयाविरोधात राज्यभरातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यातच लक्ष्मण हाके यांनी स्वतःचा एक वेगळा आंदोलनाचा मार्ग निवडल्याचं दिसून येतंय. हाके हे सातत्याने बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यात, सर्कलमध्ये आणि गावपतळीवर सभा घेताना दिसून येत आहेत.
यापूर्वीच्या हाकेंची आंदोलनं बीडमध्येच झालेली आहेत. बीडच्या बाहेर त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतं. पण मग बीडमध्ये हाकेंना एवढं समर्थन क मिळतं? त्यांचं आंदोलन खरंच कुणाच्या रिचार्जवर चालतं का? हे पाहाणंदेखील महत्त्वाचं आहे. कारण तसे आरोप झालेले आहेत.