
Beed Crime: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे बीड येथील पवन करवर यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्याला कारण होतं त्यांनी मराठा समाजाबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान. 'एकेकाला ताणून मारेन' अशी धमकी देणारा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले होते.