deglur heavy rain
sakal
देगलूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन दिवस लेंडी व मन्याड नदीचा ओसरलेला पूर पुन्हा आला असून दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर हैदराबाद अकोला मार्गावरील व वझरगा टाकळी जवळील रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळे या मार्गे नांदेड कडे जाणारा राष्ट्रीय मार्ग पुन्हा एकदा सकाळी बंद झाला होता मात्र दुपारनंतर तो पुववत सुरू करण्यात आला.