
छत्रपती संभाजीनगर : मागील ४० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह तेलंगणा राज्याने बघितलेल्या लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्पाचे स्वप्न साकारत असून महिनाभरातच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी दिली. या प्रकल्पाला १९८६ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रकल्पामुळे दोन राज्यांतील २७ हजार हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे.