

Leopard Attack in Khamgaon Shivar
sakal
कन्नड : तालुक्यातील खामगाव शिवारातील गट क्रमांक १६६ मधील खुल्या पत्र्याच्या शेडमध्ये विश्वनाथ नामदेव कवडे या शेतकऱ्यांनी बांधलेल्या तीन जनावरांपैकी बिबट्याने एका १५ महिण्याच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी (ता.२) सकाळी उघडकीस आली.तालुक्यातील विविध भागांत बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फडशा पाडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. बिबट्याची दहशत कमी होण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.