
शिरूर कासार : तालुक्यातील कोळवाडी-रुपूर शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी (ता.२०) कोळवाडी येथील गिदेवाडी शिवारातील शेतात बिबट्याचे मृत शावक आढळल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या घटनेनंतर शेतकरी भयभीत झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.