
तुळजापूर तालुक्यात बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भूम तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या भागात वन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच बिबट्या दुसऱ्या तालुक्यात आढळून आल्याची चर्चा सुरु होते. यामुळे वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही धावपळ होत आहे.