

Leopard Kills Cow in Bhendala Gangapur Farmers Seek Cage Patrols and Safety Measures Amid Rising Leopard Movement
esakal
-जमील पठाण
कायगाव : भेंडाळा ( ता.गंगापूर)शिवारात बिबट्याने गाईवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी (ता.३०) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भेंडाळा शिवारातील गट क्रमांक १९८ मध्ये शेतकरी साहेबराव विश्वनाथ तेलंगे यांच्या शेतात ही घटना घडली आहे.