
पाटोदा : आष्टी तालुक्यातील मातकुळी, वनवेवाडी आणि भुरेवाडी परिसरात गेल्या काही वर्षांपासून वावरणारा बिबट्या अखेर आष्टी उपवन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेरबंद केला. पाटोदा तालुक्यातील कारेगाव व मेंगडेवाडी येथे हल्ला करणारा हाच तो बिबट्या आहे का? याबाबत वनविभागाकडून पुष्टी मिळालेली नाही.