
जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील येलदरी धरणाच्या पाणलोट (Yeldari dam comand area) क्षेत्राच्या जलाशयातील एका बेटाच्या काठी एक बिबट्या मृतावस्थेत (Leapard death) आढळून आला. सदरील घटना शुक्रवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास किन्ही गावाच्या परिसरात मासेमारी करणाऱ्यामुळे उघडकीस आली. (Leopards die on shores of Yeldari reservoir; Incidents in Jintur taluka)
शुक्रवारी कोठा, कीन्ही शिवारातील मत्स्यव्यवसाय करणारे नागरिक दुपारी जलाशयात मासेमारी करत असताना सायंकाळी साडेतीनच्या सुमारास पाण्यावर बिबट्या मृत अवस्थेत तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या लोकांनी ही माहिती कीन्ही गावचे सरपंच व पोलिस पाटील यांना कळवली असता त्यांनी सदरील घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी आणि बामणी पोलिसांना दिली.
हेही वाचा - Astronomy Day : आकाशाशी नाते जडवा आणि निसर्गाच्या अनोख्या अविष्काराचे साक्षी बना.
सायंकाळच्या सुमारास प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे, वनपाल गणेश घुगे, वनपाल भंडारे, बामणी पोलिस ठाण्याचे अधिकारी श्री. गव्हाणे, कीन्हीचे सरपंच श्री. वाकळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढलेा.
मयत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्युचे निश्चित कारण सांगता येईल असे श्री. कच्छवे यांनी सांगितले. दरम्यान या भागात मागे एक दोन वेळा बिबट्या आढळून आला होता. मात्र तो वन विभागाच्या हाती लागला नव्हता. यावेळेला मात्र बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने या भागात पाण्याच्या ओढीने आणखी बिबट्याचे वास्तव्य असू शकते अशी शक्यता वाटत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.