
नांदेड : व्यसनाच्या आहारी जाणारी आपली ही तरुणपिढी मग ते मुले असोत वा मुली स्वत: उद्ध्वस्त होणारच. सोबत आपले कुटुंब आणि देशालाही देशोधडीला लावणार हे वास्तव नाही का? राष्ट्रीय गुन्हे विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात व्यसनाधिनतेचे सर्वाधिक मृत्यू आहेत. मुलं अगदी कोवळ्या वयात व्यसनाच्या आहारी जाताहेत. असे का घडावे? नेमकी कुठली कारणं याला कारणीभूत आहेत? या मुलांना नशाखोरीपासून कसे रोखता येईल? आणि जी व्यसनाधिन आहेत त्यांना या गर्तेतून कसे सुखरुप बाहेर काढता येईल? या गंभीर प्रश्नांवर मात करण्यासाठी विद्यादानाच्या कर्तव्याला व्यसनमुक्तीची सांगड घालून छाया बैस -चंदेल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत आहेत.
व्यसनांच्या विळख्याने देशासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळते. माणूस व्यसनाधीनतेच्या खाईत कौटुंबिक-सामाजिक अस्थैर्य, काही वैयक्तिक कारणे, आयुष्यातील समस्या यामुळे; तर कधी, स्वत:हूनच लोटला जातो. व्यसनाधीन माणूस हळुहळू स्वत:पासून, समाजापासून दुरावत जातो. त्याच्यातील आत्महत्येची प्रवृत्ती नैराश्याने ग्रासला गेल्याने वाढीस लागते.
अशा व्यसनांधतेत गुरफटलेल्यांना बाहेर काढण्यासाठी, व्यसनांच्या आहारी गेलेल्यांचे मतपरिवर्तन करण्याची आगळी-वेगळी लढाई सहशिक्षिका छाया बैस- चंदेल लढत असून, बालवायात शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जानीव घडवून देत आहेत.
हेही वचा - शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेस सुरवात
व्यसनमुक्तीच्या कल्पकतेला आयाम
व्यसनमुक्तीच्या कल्पकतेला पोस्टरवर उतरुन शाळेत भित्तीचित्रांच्या माध्यमातून व्यसन म्हणजे काय, ते कशामुळे जडते, त्याचे विपरित परिणाम या विषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन करत आहेत. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत समाजात परिवर्तन आणण्यासाठी शाळांपासून त्यांनी धडपड सुरू केली. घरच्यांचा पाठिंबा आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने सुरू केलेली जिद्द छाया बैस - चंदेल यांनी मनाशी कायम ठेवली. जिल्हा परिषदांच्या विविध शाळात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाटय, पोस्टर संदेश, भित्तीचित्राद्वारे छाया बैस- चंदेल यांनी व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करत आहेत.
येथे क्लिक करा - निवासस्थाने नटली पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला
जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रबोधन -
विद्यादानाच्या कर्तव्याला परिवर्तनाची सांगड घालत छाया बैस - चंदेल यांनी जिल्हा परिषद शाळा वाहेगांव (ता. हदगांव), मोशी (ता. भोकर), एकराळा (ता. हदगांव), गणगांव (ता.हदगांव) त्याच बरोबर विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जानिव घडवून दिली आहे. त्यांनी पोस्टरवर उतरवलेली व्यसनमुक्तीची कल्पकता व्यसनाधिन लोकांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घालणारी ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.