गावकुसातील भिंतीही लागल्या बोलू

ahvni 3.jpg
ahvni 3.jpg


देगलूर, (जि.नांदेड) ः एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा व तेथे शैक्षणिक दृष्टीने नसलेल्या बहुतेक सुविधा, ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थ्यांची इंग्रजी शाळांकडे वाढत झालेली ओढ हे सर्व भेसूर चित्र ग्रामीण भागात दिसत असतानाच काही उपक्रमशील शिक्षकांच्या कार्यातून तालुक्यातील अगदी गावकुसाची अस्सल बाज असणारी शाळा ही आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकनास पात्र ठरली आहे.


या सर्व उपक्रमशील शैक्षणिक कार्याला तालुका तसेच जिल्हास्तरीय शिक्षण खात्याचे योगदान तर लाभतच आहे. त्यातही त्या त्या गावातील ग्रामस्थांचाही सहभाग राहिल्यानेच हे हाती पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करण्यासाठी अनेक किचकट निकष आहेत. अगदी जुने अभिलेखे, नवीन अभिलेखांची अद्यावत मांडणी, परिसरातील स्वच्छता, कॅम्पस परिसरात पुरेशे क्रीडांगण, तसेच परसबाग, प्रत्येक वर्गात शैक्षणिक व भौतिक सुविधेसह अध्ययन साहित्य, प्रत्येक वेळेस विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यासाठी तेथील शिक्षकांना मोठी शिकस्त करावी लागते. ते काम त्या-त्या प्रशालेतील शिक्षक, मुख्याध्यापकांनी पूर्णत्वास नेल्याने आज त्यांना हे यश हाती लागले आहे. या सर्व शाळांना मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्याची मुदत पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे.

इमारती झाल्या बोलक्या
या शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेसकोडसह संगीत शिक्षणाचेही धडे दिले जात आहेत. आधुनिक जगातील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना संगणकाचेही प्रशिक्षण दिल्या गेले आहे. इमारतीच्या प्रशस्त भिंतीही आज बोलक्या झाल्या आहेत. तसेच त्यांना दिलेल्या रंगरंगोटीतून रेल्वेचा बाज आल्याने यातून विद्यार्थ्यांचे कलागुण वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

परस बागेतून वृक्ष संगोपनाचा संदेश
शाळा व परिसरातील रिकाम्या जागेत वृक्षलागवड करून सुंदर अशी परसबाग निर्माण करण्यात आल्याने यातून विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीबरोबरच वृक्ष संगोपनाचा संदेश दिला जात आहे. ‘आयएसओ’ मानांकित नऊ प्रशाला तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला शिवणी आचेगाव (जुने मालेगाव, सांगवी, अल्लूर, अल्लापूर, मरखेल, शहापूर, सुगाव) या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वी होण्यासाठी त्या-त्या गावातील ग्रामस्थ व प्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असतो. ही सर्व कामे लोकसहभागातून पुढे न्यायची असतात. तालुक्यातील त्या-त्या गावातील ग्रामस्थ व त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी आपले योगदान दिल्यानेच हे पूर्णत्वास जाऊ शकले.


११,४३८ विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे
सद्यस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून इयत्ता पहिली ते दहावी साठी ६७८४ विद्यार्थिनी, तर सहा हजार ६५४ विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. प्रत्येक केंद्रातून एक शाळा ‘आयएसओ’चा संकल्प
आगामी शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एक शाळा ‘आयएसओ’ करण्याचा संकल्प आम्ही केला असून या वर्षात दहा शाळांचे उद्दिष्ट ठरविले गेले होते. त्यातून आम्ही नऊ शाळांना त्या ध्येयापर्यंत पोचू शकलो, या कामी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींचे सहकार्य फार मोलाचे आहे असे राजकुमार जाधवर, गटशिक्षणाधिकारी, देगलूर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com