esakal | एका पत्राने शेतकऱ्यांची चिंता मिटली, कुठे आणि कशी ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

samiti

आखाडा बाळापूर, बाजार समितीत शेतमाल खरेदी - विक्रीला परवानगी दिल्याचे पत्र जिल्‍हाधिकाऱ्यांनी पाठविला आहे. याबाबत सभापती दत्ता बोंढारे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. 

एका पत्राने शेतकऱ्यांची चिंता मिटली, कुठे आणि कशी ते वाचा...

sakal_logo
By
विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर (जिल्हा हिंगोली) : येथील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत गावांमधून शेतमाल खरेदी - विक्रीला एक दिवसाआड परवानगी देण्यात आली असून या बाबत नुकतेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्र पाठविले आहे. या बाबत सभापती दत्ता बोंढारे यांनी पाठपुरावा केला होता.

बाळापूर बाजार समितीअंतर्गत येथील मुख्य बाजारपेठ तसेच डोंगरकडा, बोल्डा, लाख या उपबाजारपेठ येतात. या बाजारपेठांमधून मोठा प्रमाणात शेतीमालाची खरेदी-विक्री होते. सोयाबीन ऑक्टोबर ते जून महिन्यापर्यंत शेतमालाची खरेदी - विक्री केली जाते. या भागात सोयाबीन, तूर, उडीद, मूग, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सोयाबीनच्या लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे बाजार समितीअंतर्गत सोयाबीनची खरेदी - विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यापाठोपाठ तूर, हरभरा, गहू या पिकांची ही खरेदी-विक्री होत असते.

हेही वाचा - ऑनलाइन देयके भरण्याला ‘या’ तालुक्याची पसंती

व्यवहार बंद झाल्याने व्यापारी होते अडचणीत 
या वर्षी सोयाबीन हंगामाच्या काळातच सोयाबीनचे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनाचा साठा करून ठेवला आहे. त्यानंतर हरभरा व तूर काढणी नंतरही बाजारपेठेत शेतमालाला उठाव आलाच नाही. त्यामुळे ही पिके शेतामध्ये, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे. 

हेही वाचा - पिकांची काढणी केली पण खरेदीदार मिळेनात, कुठे ते वाचा...

शेतकऱ्यांची अडचण बोंढारे यांनी मांडली 
शेतीमाल खरेदी - विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी भुसार व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे केली होती. शेतकरी व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठवून शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांची होणारी अडचण मांडली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांची भेट घेऊन शेतमाल खरेदी - विक्रीला परवानगी देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. सभापती दत्ता बोढारे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजार समितीअंतर्गत एक दिवसआड करून सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत शेतमाल खरेदी - विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता येथे शेतमाला खरेदी - विक्री होणार आहे.

loading image
go to top