नरहर कुरुंदकरांच्या जीवन- विचारांचे अद्भूत दर्शन

फोटो
फोटो

नांदेड : सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणाऱ्या एका अनोख्या कार्यक्रमाचा रसरशीत अनुभव काल नांदेडकरांनी घेतला.

'नरहर कुरुंदकर - एका विचारवंताची अपरिचित गोष्ट' या नाटकाच्या अभिवाचनाचा अभिनव नाट्यप्रयोग येथील प्रथितयश कलाकरांनी कुसूम नाट्यगृहात मंगळवारी (ता. ११) सादर केला. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांची होती.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी

इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समिक्षा अशा विविध विषयांवरील मुलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. पुरोगामी विचाराच्या मांडणीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संस्था उभारणीला त्यांनी मोठे पाठबळ दिले होते. विद्यार्थी घडविणे आणि मराठवाड्यातल्या व्यक्ती आणि संस्था यांना प्रोत्साहन देण्याची मोठी कामगिरी त्यांनी त्यावेळी केली.

हेही वाचासाईबाबांच्या नंतर आता संत जनाबाईंसाठी  जनआंदोलन !
 
प्रेक्षक भारावून गेले

या सर्व पैलूंची अत्यंत रंजक मांडणी या प्रयोगात करण्यात आली आहे. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, परिणामकारक संगीत, प्रसंगांना उठाव देणारे संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण, यामुळे प्रेक्षक भारावून गेले. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपायुक्त आहेत हे या प्रयोगाने यशस्वीपणे मांडले.

नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान

नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, रुपवेध ग्रंथालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माध्यम शास्त्र तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांनी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. तन्मय ग्रुपचे सहकार्य या प्रयोगाला होते.


मुंबईच्या कलाकारांचे सहकार्य

या नाट्यप्रयोगात दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, डॉ. नंदू मुलमुले, राजीव किवळेकर, गणेश पांडे, अजय अंबेकर, दिनेश कवडे, विश्वम कुलकर्णी आणि स्वाती देशपांडे यांचा सहभाग होता. नेपध्य आणि तंत्र व्यवस्थान लक्ष्मण संगेवार आणि माधव चिलके, संगीत मुंबई येथील प्रशांत ठाकरे, रेखाचित्रे सुबोध पाटील, शुभम हुलसुरे प्रकाश योजना कैलास पुपुलवाड, शफीक शेख आणि ध्वनी संयोजन वामन गाजरे, किरण सोनखेडकर यांनी केले.

अनेकांची होती उपस्थिती

यावेळी कुरुंदकरांचे समकालीन भूजंग वाडीकर, प्र. तु. शास्त्री, भगवंत क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दत्ता भगत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे माध्यम शास्त्र प्रमुख डॉ. दीपक शिंदे, माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, माजी आमदार गंगाधर पटने, सुरेश पुरी, डॉ. सुरेश खुरसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी, आदी नांदेडकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नाट्यप्रयोगाचा आनंद रसिकांनी उत्साहात घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com