Lightning Strike : गेवराईत वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला जखमी

बीडमधील गेवराईतील काही भागात रविवार अन् सोमवारी वादळी वारा विजेचा कडकडाटसह परतीच्या पावसाने हजेरी लावली.
Lightning Strikes
Lightning Strikessakal
Updated on

गेवराई (जि. बीड) - बीडमधील गेवराईतील काही भागात रविवार अन् सोमवारी वादळी वारा विजेचा कडकडाटसह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस सुरू असतानाच वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान, गेवराईच्या रोहीतळ शिवारात घडली असून, जखमी महिला यांच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com