

Marathi Language Push Gains Support at Literary Meet; Pension Demand for Writers Raised
esakal
धाराशिव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात परिवहन खात्याने टॅक्सी व रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे नमूद करत राज्य शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मराठी भाषा संवर्धन आणि सर्वसामान्य नागरिकांशी सुलभ संवाद साधण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.