
नांदेड : येथील सप्तरंगी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाने शहरानजीक असलेल्या वाजेगाव, धनेगाव परिसरातील लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेल्या एका वीटभट्टीवरील कामगारांची बारा कुटुंबे दत्तक घेऊन आपले दायित्व निभावले आहे. याकामी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, महासचिव पांडुरंग कोकुलवार, साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी पुढाकार घेत हा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारा कुटुंबांना घेतले दत्तक
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात शेकडो कुटुंबे विविध वीटभट्टी कामासाठी वास्तव्य करुन आहेत. लाॅकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे तयार मालाला उठाव नाही. त्यामुळे या कुटुंबांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यापैकी एका वीटभट्टीवर वास्तव्यास असलेल्या वजीरगाव, उस्माननगर, उमरा, काबा, गंगाखेड, कामारी येथील एकूण बारा कुटुंबांना साहित्य मंडळाने दत्तक घेतले आहे.
हेही वाचा.....मनुष्यबळाची माहिती ऑनलाईन सादर करा
शब्दांना दिली कृतीची जोड
अनेक दानशूर लोक पुढे येत असतांना घरात बसून केवळ शब्दांचा भुलभुलैय्या न खेळता आपल्या शब्दांना कृतीची जोड देत इतरांपुढे सप्तरंगी साहित्य मंडळाने आदर्श ठेवला आहे. या कुटुंबाना मंडळाकडून तांदूळ, गहू , दाळ, साखर, मिरची पावडर, तेल यासह इतर जीवनोपयोगी वस्तूंचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे.
हेही वाचलेच पाहिजे.... शाळकरी मुलीने दिले पंतप्रधान सहायता निधीसाठी सोन्याचे दागिने, वाचा कुठे ?
बाहेरगावातील कुटुंबांना मिळत नाही मोफत तांदुळ
वीटभट्टीवरील सर्व कामगार कुटुंबे बाहेरगावातील असल्याने त्यांना मोफत तांदूळ व इतर योजनांचे फायदे मिळत नाहीत. मालाला उठाव नसल्यामुळे लाखो रुपयांचा माल पडून आहे. त्यामुळे गोरगरिबांची चूल पेटणे कठीण आहे, असे मुकादम त्रीसरण भदरगे यांनी सांगितले.
चव्वेचाळीस लोकांचा समावेश
त्यांच्यासोबत सचिन सोनसळे, अनिल सोनटक्के, राहुल गायकवाड, रवी सोनसळे, सुनील वावळे, किरण काटे, दीपक पवार, सुरेश नरवाडे, घनश्याम विश्वकर्मा, एकनाथ भदरगे, बाळासाहेब सोनसळे यांची कुटुंबे असून त्यात लहान मोठे मिळून एकूण चव्वेचाळीस लोक आहेत. अशा ठिकाणच्या इतर कुटुंबानाही धान्य व जीवनोपयोगी साहित्य मिळावे यासाठी दात्यांनी पुढे यावे असे आवाहन विशालराज वाघमारे, अनिल हनमंते, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, प्रशांत गवळे यांनी केले आहे.
गरजूंच्या मदतीला धावले माजी सैनिक
सद्याच्या वैश्विक कोरोना संकट समयी गरीब, मजूर लोकांना जीवनावश्यक वस्तू धान्य, किराणा, भाजीपाला घरपोच देण्याचा आदर्श उपक्रम रजेवर येवून लाॅकडाउनमुळे अडकलेला जवान प्रविण देवडे त्याच्या तरूण मित्रासह उत्कृष्ट पणे राबवित आहे. भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र नांदेड जिल्हा केद्राचे अध्यक्ष रामराव थडके यांनी आपल्या वैयक्तिक खात्याचा दहा हजार रूपयांचा धनादेश प्रविण देवडेना देवून या मोहिमेत सामील झाले. तसेच त्यांनी संघटनेच्या सर्व सभासदांना आवाहन केले कि प्रत्येकाने यथाशक्ती मदत करून प्रविण देवडेंच्या मोहीमेत खारीचा वाटा उचलावा. आर्थिक मदत धनादेश, खाते हस्तांतर, रोख रकमेच्या स्वरूपात करता येईल. शेतकरी, माजी सैनिकांकडून धान्य, भाजीपाला पण स्विकारला जाईल. महापालिकेने त्यांना गांधी पुतळ्या जवळच्या शाळा क्रमांक एकमध्ये माल साठवण, वितरणात साठी दोन खोल्या दिल्या आहेत. त्या ठिकाणी प्रविण देवडे यांना भेटून आपले योगदान देता येइल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.