मनुष्यबळाची माहिती ऑनलाईन सादर करा

शासकीय कार्यालय मनुष्यबळ.jpg
शासकीय कार्यालय मनुष्यबळ.jpg
Updated on

नांदेड : सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० अन्वये मार्च २०२० अखेर संपणाऱ्या मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-१ मध्ये विहीत मुदतीत जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी ऑनलाईन गुरुवारपर्यंत (ता. ३०) सादर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे. 

खासगी व शासकीय अस्थापनावरील माहिती
सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे ) कायदा १९५९ व नियम, १९६० च्या कलम ५ (१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम ५ (२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

युझर नेम व पासवर्डचा वापर करावा
मार्च -२०२० अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड या कार्यालयाद्वारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून पूर्ण  प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच युझर नेम व पासवर्ड या कार्यालयाकडून देण्यात आली आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर लॉगीन करावे व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

हेही वाचलेच पाहिजे.... लॉकडाउनमध्येही वीटभट्या सुरूच

माहिती नोंदवून तत्काळ अद्यावत करावी
सदर तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम गुरुवार ता. ३० एप्रिल ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तव्दतच प्रत्येक आस्थापनांनी आपापला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तत्काळ अद्यावत करावी. यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी nandedrojgar@gmsil.com यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com