esakal | लॉकडाउनमध्येही वीटभट्या सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

naygav.jpg

कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत आहे. संचारबंदीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एकही कोरोना बाधित जिल्ह्यात येऊ नये या बाबत काळजी घेतल्या जात असून कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करा किंवा रुमाल बांधा, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाला नायगाव तालुक्यात राहेर व इज्जगाव तसेच लोहा तालुक्यातील वाका येथे सुरू असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगार व मालकांनी हरताळ फासला आहे.

लॉकडाउनमध्येही वीटभट्या सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नायगाव, (जि. नांदेड) ः तालुक्यातील राहेर व इज्जतगाव येथे लाॅकडाउनमध्येही वीटभट्या सुरूच आहेत. विशेषत: येथे सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याच्या आदेशाला येथील मालक व मजूरांकडून हारताळ फासण्यात आला असून. जिल्ह्याच्या सीमा बंद असताना मात्र, वीटभट्टीसाठी लागणारा दगडी कोळसा व साळीचा भुसा मात्र आंध्र व कर्नाटक राज्याच्या सीमा ओलांडून येत आहे. या गंभीर प्रकाराकडे नायगाव महसूलचे जाणूनबुजून तर दुर्लक्ष होत नाही ना, हा प्रश्न जनतेला पडला आहे.

हेही वाचा -  प्रवाशी नागरिकांवर ‘ही’ समिती ठेवणार आता वॉच

कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत आहे. संचारबंदीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एकही कोरोना बाधित जिल्ह्यात येऊ नये या बाबत काळजी घेतल्या जात असून कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करा किंवा रुमाल बांधा, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाला नायगाव तालुक्यात राहेर व इज्जगाव तसेच लोहा तालुक्यातील वाका येथे सुरू असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगार व मालकांनी हरताळ फासला आहे.

यंत्रणा काय करते ?
विशेष म्हणजे विटांसाठी चंद्रपूर येथून दगडी कोळसा, तर तेलंगणामधून भुस्याचे ट्रक ओहरलोड भरून येत आहेत. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने जवळपास पंचवीस दिवसांपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू केली असून जिल्हा व राज्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. असे असताना शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत सर्रासपणे भुसा व कोळशाने भरलेली वाहने तेलंगणा तसेच कर्नाटकच्या सीमा ओलांडून राहेर, इज्जगाव, वाका येथील वीटभट्यांवर येत आहेत. असताना बिलोली, देगलूर व धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती भागात बंदोबस्तावर असलेली यंत्रणा काय करते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.