Video : ‘लॉकडाऊन कोरोना : चर्चातर होणारच ना भाऊ...’, कोण म्हणतंय, ते वाचा

Nanded News
Nanded News

नांदेड : कोरोनाच्या महामारीला हरवण्यासाठी सध्यातरी घरात बसणे हाच एकमेव उपाय सुचवला जात आहे. देशाचे पंतप्रधान, त्या-त्या राज्याचे मुख्यमंत्री, वैज्ञानिक, डॉक्टर्स याशिवाय प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून घरात बसण्याचा सल्ला सोशल मिडिया, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून देत आहेत. घरात बसून कोरोनाशी लढणे हा एकमेव मार्ग असल्याचे पोटतिडकीने सांगूनही कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. परिणामी, कोरोनाचे गांभीर्य काही दीडशहाणे घेत नसल्याने दिवसेंदिवस त्याचे परिणाम दिसून येत आहे. असे असतानाही काही नागरिक सुधारण्याचे नाव घेत नाही, हे वास्तव बघायला मिळत आहे.

सेलिब्रिटींसोबतच आता नांदेड शहरातील बालचित्रकारही जनजागृतीसाठी पुढे आले आहे. नांदेडच्या बाल कलाकारांनी ‘कोरोना’ संदर्भात जनजागृतीचा शेवटचा पर्याय म्हणून भन्नाट कल्पना स्वतःच्या शक्तीच्या जोरावर प्रत्यक्षात उतरवली आहे. रिकामे फिरुन कोरोनाला आमंत्रण देण्याच्या दिशेनी वाटचाल करणाऱ्या नांदेडकरांना भानावर आणण्यासाठी शेवटचे हत्यार आहे. 

त्यासाठी शहरातील मुख्य रस्ते, चौकात चित्रांच्या माध्यमातून पोस्टर लावून कोरोनाला हरविण्यासाठी अतिशय मार्मिक पद्धतीने कोरोनाला हरवण्यासाठी घरात बसण्याचा सल्ला दिला आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले हे चित्रस्वरुपातील प्रदर्शन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या दीडशहाण्यांचे लक्ष वेधुन घेत आहे. तर शाहण्याला त्यातुन जणू कोरोना विरुद्ध लढण्यासाठी बळ मिळत आहे.

हेही वाचाच - भाग एक : शेतकऱ्यांनी ‘अशी’ करावी शेतीची कामे ​

असे आहेत स्लोगन
‘गो कोरोना, कोरोना बुलाता है, मगर जानेका नही, पापा की परी हो या मम्मी का हेलिकॅप्टर कुछ दिन घरमेही उडने, स्टे होम, स्टे होम स्टे सेफ, प्रवास करणे टाळा, अरे बापु घरी जा की, थोडे दिवस पांघरुन घेऊन घरीच झोपा, या अस्मानी संकटावर फत्ते शिकस्त मिळवायचीच, कोरोना आला घरी जा आणि सर्वात शेवटी ‘मी नालायक आहे जो बाहेर फिरतोय’ असे संदेश देणारे पोस्टर जागो जागी लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर कोरोनाच्या जहरील्या विषाणूचे चित्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या पोस्टरवरील स्लोगनमध्ये अधिकच भर घालताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com