esakal | लॉकडाऊन : पदवी, पदव्युत्तर परीक्षेचे काय? विद्यार्थ्यांमध्ये चिंता     
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

देशात लॉकडाऊन असून ही परिस्थिती कधी सुरळित होणार? याबद्दल सध्यातरी काही निश्चित नाही. त्यामुळे लॉकडाऊन अजुन काही दिवस जैसे थेच राहणार की, परिस्थिती पूर्ववत होणार? या बद्दल संभ्रमावस्था कायम आहे. 

लॉकडाऊन : पदवी, पदव्युत्तर परीक्षेचे काय? विद्यार्थ्यांमध्ये चिंता     

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त आहेत. केंद्र शासनाने १४ एप्रिल २०२० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. मात्र लॉकडाऊन दरम्यान रोज ‘कोरोना’ संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे १४  एप्रिलनंतर देखील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.  पुढील काही दिवस लॉकडाऊनची अशीच परिस्थिती राहिल्यास, आमचे वर्ष वाया तर जाणार नाही ना? अशी भिती आता विद्यार्थ्यांना वाटत आहे. 

हेही वाचा- वर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा

विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नाचे काहुर
लॉकडाऊन करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठांनीही परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचाही समावेश आहे. यामुळे सर्व विद्यार्थी आपल्या आपल्या गावी गेले आहेत. आजची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परीक्षा कधी होणार? परीक्षा होणार का नाही? पुढचं आमचं शैक्षणिक नुकसान होणार तर नाही ना? अशा एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. 

हेही वाचले पाहिजे- कोवीड-19 : वंचितकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण

क्षणिक नियोजन बिघडूनये
एप्रिल महिन्याच्यानंतर परीक्षा घ्यायच्या ठरवल्या तर परीक्षेला तब्बल दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे परीक्षा जून-जुलै महिन्यात संपतील. ज्या महिन्यात ॲडमिशन घ्यायचा काळ असतो त्याच महिन्यात परीक्षा होत असतील तर विद्यापीठाचे पुढील काही वर्षांचे शैक्षणिक नियोजन बिघडून जाईल. याचा विद्यापीठावर, प्राध्यापकांवर व विद्यार्थ्यांवर देखील विपरीत परिणाम होतील, अशी शक्यता शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

विद्यार्थ्यांच्या मनावरचा तान हलका व्हावा
राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा व विद्यार्थ्यांच्या मनावरचे ओझे कमी करावे 
-श्रीकांत जाधव  विभागीय अध्यक्ष मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट विद्यार्थी संघटना
 

loading image