

Drunk man’s fake 112 call exposes illegal liquor.
Sakal
जेवळी : दारूच्या नशेत आपत्कालीन सेवा 'डायल ११२' वर कॉल करून खोटी माहिती देणे एका व्यक्तीला पडले महागात पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या आणि स्वतःजवळ बेकायदेशीर देशी दारू बाळगणाऱ्या त्या व्यक्तीविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता.६) सकाळी करवंजी (ता. लोहारा जि. धाराशिव) येथे घडली आहे.