

School bus gutted in fire at Lohara, while all passengers escaped safely.
esakal
लोहारा : खासगी कार्यक्रमासाठी काही प्रवाशांना घेऊन जात असताना शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात स्कूल बसला आग लागली. काही वेळेतच ती खाक झाल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना वेळीच खाली उतरविल्याने अनर्थ टळला.