esakal | LOHARA CORONA UPDATE : चोवीस तासात तीन बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

तालूक्यातील एकूण ७७ जणांची कोविड तपासणी करण्यात आली. यातील १८ जणांचा तपासणी अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागातील दहा तर लोहारा शहरातील आठ जणांचा यात समावेश आहे.

LOHARA CORONA UPDATE : चोवीस तासात तीन बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
नीलकंठ कांबळे

लोहारा (उस्मानाबाद) : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ४२६ वर पोचला आहे. शुक्रवारी (ता.१८) त्यात अठरा रूग्णांची भर पडली आहे. दरम्यान मागील चोवीस तासात सास्तूर, जेवळी, आष्टाकासार येथील तीन कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालूक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या अकरावर पोचली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
  
तालूक्यातील एकूण ७७ जणांची कोविड तपासणी करण्यात आली. यातील १८ जणांचा तपासणी अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागातील दहा तर लोहारा शहरातील आठ जणांचा यात समावेश आहे.

सास्तूर, जेवळी, आष्टाकासार येथील वृद्धांचा मृत्यू

दरम्यान, सास्तूर येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाचा गुरूवारी (ता.१७) रात्री साडे दहाच्या सुमारास लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. १३ सप्टेंबर रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने लातूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील १० जणांची तपासणी केली असता सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर एकाचा अहवाल अनिर्णित आहे. कोरोनाबाधित रूग्णांना शहरातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जेवळी येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दहा दिवसापूर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर आष्टाकासार येथील ५६ वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना वास न येणे, चव न कळणे घशात खवखव होणे, ताप येणे आदी त्रास सुरू होता. आष्टाकासार येथील कोरोनाचा तीसरा बळी गेला आहे. तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२६ वर पोचला आहे. तर २२७ रूग्ण बरे झाले आहेत. यात अकरा जणांचा बळी गेला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)