Lohgaon-Gadhegaon Pazar Lake Overflows
sakal
- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव - पैठण तालुक्यातील लोहगाव, महसूल मंडळातील शेत शिवारात मंगळवार (ता. २३ ) मध्यरात्री विजांच्या गडगडाटात ढगफुटी सदृश्य दोन तास जोरदार पडलेल्या पाऊसाने थैमान घातल्याने शेती पिकांत तळ्याचे स्वरूप आले असून, दुसरीकडे पस्तीस वर्षांनंतर प्रथमच लोहगाव, गाढेगाव पैठण शिवारातील पाझर तलाव शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहिल्याने येणाऱ्या रब्बी हंगामाला हा जलसाठा उपयुक्त ठरणार आहे.