Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्हातील मतदान केंद्रावर दहा हजार रुग्णावर उपचार

फुलंब्री : 926 जणांना उष्माघाताचा त्रास : आरोग्य विभागाची माहिती
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSakal

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी घेण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये 1 हजार 932 मतदान केंद्रावर तब्बल दहा हजार 217 रुग्णावर उपचार करण्यात आले आहे.

यामध्ये 926 जणांना उष्माघाताचा त्रास जाणवला. यात 2 हजार 242 कर्मचाऱ्यांची जिल्हाभर असणाऱ्या मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1 हजार 932 मतदान केंद्र होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वयोवृद्ध नागरिकांसह सर्वसामान्यांनाही उष्माघाताचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत होता.

याची खबरदारी घेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र पथक तैनात केले होते. सदरील पथक सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रावरच ठाण मांडून होते.

त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना रांगेत उभे असताना काही त्रास जाणवला तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दहा हजार 217 रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

छातीत दुखणाऱ्या मतदारांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला या पथकाने दिला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने तैनात करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर तब्बल 2 हजार 242 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

यात 926 जणांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने या मतदान केंद्रावर असलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने प्राथमिक उपचार केले. यामध्ये सर्वाधिक पैठण तालुक्यात दोन हजार 39 रुग्णावर उपचार करण्यात आले तर त्या खालोखाल गंगापूर तालुक्यात एक हजार सहाशे 54 रुग्णावर उपचार करण्यात आले. तर सर्वात कमी खुलताबाद तालुक्यात 174 रुग्णावर उपचार झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री तालुक्यातील 136 मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. यात तालुक्यात 526 जनावर प्राथमिक उपचार मतदान केंद्रावर करण्यात आले. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

- डॉ.प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी फुलंब्री

तालुका निहाय मतदान केंद्र व उपचार केलेले रुग्ण

 • छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्र 215 : उपचार केलेले रुग्ण 614

 • गंगापूर : मतदान केंद्र 253 : उपचार केलेले रुग्ण 1654

 • कन्नड : मतदान केंद्र 359 : उपचार केलेले रुग्ण 785

 • खुलताबाद : मतदान केंद्र 95 : उपचार केलेले रुग्ण 174

 • पैठण : मतदान केंद्र 240 : उपचार केलेले रुग्ण 2039

 • फुलंब्री : मतदान केंद्र 136 : उपचार केलेले रुग्ण 526

 • सिल्लोड : मतदान केंद्र 296 : उपचार केलेले रुग्ण 1164

 • सोयगाव : मतदान केंद्र 106 : उपचार केलेले रुग्ण 369

 • वैजापूर : मतदान केंद्र 232 : उपचार केलेले रुग्ण 1292

 • जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र : 1932

 • जिल्ह्यात एकूण उपचार केलेले रुग्ण : 10,217

 • जिल्ह्यातील एकूण नियुक्त आरोग्य कर्मचारी : 2242

 • जिल्ह्यात उष्माघातेचा त्रास झालेले रुग्ण : 926

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com