Loksabha Election 2024 : मतदानासाठी निवडणुक विभागाची यंत्रणा सज्ज

सोमवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेतील साहित्य घेवून मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
loksabha election 2024
loksabha election 2024sakal

उमरगा, (जि. धाराशिव) - उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील उमरगा, लोहारा विधानसभा मतदार संघात मंगळवारी (ता. सात) सकाळी सात पासूनच सांयकाळी सहापर्यंत होणाऱ्या मतदानासाठी येथील निवडणुक विभागाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान सोमवारी (ता. सहा) सकाळी मतदान केंद्रावर नियूक्ती केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य देण्यात आले.

उमरगा, लोहारा तालुक्यात तीन लाख दहा हजार ७०३ मतदार संख्या आहे. मतदारसंघात ३१५ केंद्र असून उमरगा तालुका २२९ तर लोहारा तालुका ९४ मतदान केंद्र आहेत. निवडणूक विभागाने महिला मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र तयार केले असून मतदानासाठी इव्हीएम मशीन सोबत व्हिव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान उमरगा-लोहारा या मतदारसंघातील ३१५ मतदान केंद्रावर साहित्य व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी १०१ वाहने होते, त्यात २८ बसेस, खाजगी बसेस १५, दहा जीप, झोनल अधिकारी यांच्यासाठी ३९, फिरत्या पथकासाठी सहा तर बैठे पथकासाठी तीन वहानाची व्यवस्था करून यातील सर्व वाहनाना जीपीस यंत्रणा बसवून त्याचे सनियंत्रण व निरीक्षण विशेष पथकाचे मार्फत केले जात आहे.

सोमवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेतील साहित्य घेवून मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. मतदानाचे साहित्य मिळाल्यानंतर संबंधित वहानातुन कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचले. मतदान साहित्य देण्यासाठी व परत पोहचवण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे (उमरगा), तहसीलदार काशिनाथ पाटील (लोहारा), नायब तहसीलदार रतन काजळे, डॉ. अमित भारती यांनी व्यवस्थित नियोजन केले होते.

पोलिस यंत्रणा सज्ज

उमरगा तालुक्यातील मतदान केंद्रा अंतर्गत तुरोरी, माडज, गुंजोटी, मुळज शहरातील सहा असे एकुण दहा मतदान केंद्र सवेनंदशील आहेत, तेथे  अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरीक्षक, १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४५० पोलीस कर्मचारी, २६२ होमगार्ड, शंभर राखीव पोलीस दलाची स्वतंत्र तुकडी बंदोबस्तासाठी आहे.

सखी मतदान केंद्रात महिला करतील नियोजन

मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत ज्यास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी महिला मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्रात केंद्राध्यक्षापासून इतर सर्व कर्मचारी महिलाच असणार असून या संपूर्ण केंद्राची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आलेली आहे.

शहरातील गटशिक्षण कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर सखी महिला मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टिममध्ये केंद्राध्यक्ष म्हणून सरिता उपासे तर उषा सोनवने, आश्विनी गुरव, कविता देशमुख या मतदान अधिकारी म्हणून काम करणार आहेत. तसेच टीम दोन (राखीव) केंद्राध्यक्ष सोनाली मुसळे तर मतदान अधिकारी म्हणून सुवर्णा इंगळे, मीनाक्षी भुजंगे, सुक्षम चव्हाण या कामकाज पाहणार आहेत‌.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com